काही व्यक्ती खऱ्या आयुष्यातले नायक असतात. जे कोणालाही काहीही कळू न देता आपलं काम
करीत असतात. ह्यातलेच अजून एक नाव म्हणजे डॉ. थिरूवेंगदम विराराघावन. जे गेल्या चाळीस
वर्षांपेक्षा अधिक काळापासून लोकांचा उपचार करीत आहेत. त्यांनी स्टेनले मेडिकल कॉलेज मधून
1973 साली M.B.B.S. अभ्यासक्रमाची पदवी घेतली. आणि वयाच्या 67 व्या वर्षी सुद्धा ते
गरिबांचा फक्त दोन रुपयात उपचार करतात. आजूबाजूच्या डॉक्टरांनी कमीतकमी 100 रुपये तरी
घेण्यासाठी डॉ. थिरूवेंगदम यांच्यावर दबाव आणला होता. परंतु गरीब लोकं जे जेमतेम आपला
उदरनिर्वाह करतात त्यांच्यासाठी त्यांनी हा निर्णय बदलला नाही. ते म्हणतात कि खाजगी
दवाखान्यातून मिळणारा पगार हा माझ्यासाठी पुरेसा आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews